नमो शेतकरी योजनेचे व पीएम किसान योजनेचे 4000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरवात

शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक खुशखबर आहे! पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेचा 19 वा हप्ता लवकरच तुमच्या बँकेच्या खात्यात जमा होणार आहे. हा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिला जाईल.

शेतकऱ्यांना किती पैसे मिळतील?
या योजनेखाली, जे शेतकरी पात्र आहेत त्यांना 2,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात मिळतील. संपूर्ण भारतातील 9 कोटींपेक्षा जास्त शेतकरी या पैशाचा फायदा घेणार आहेत.

नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्र मिळेल का?
काही शेतकऱ्यांना प्रश्न आहे की, नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता PM किसान योजनेसोबतच मिळेल का? मागच्यावेळी दोन्ही हप्ते एकाच वेळी दिले गेले होते. पण त्या वेळी थोड्या तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे यावेळी आधी PM किसान योजनेचा हप्ता दिला जाईल. त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला जाईल.

नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी मिळतील?
महाराष्ट्रातील सुमारे 91 ते 92 लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. एकदा PM किसान योजनेचे पैसे दिल्यानंतर, केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांची यादी राज्य सरकारला पाठवेल. त्यानंतर कृषी विभाग 7 ते 8 दिवसात नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करेल. त्यामुळे हे पैसे 1 किंवा 2 मार्च 2025 पर्यंत मिळण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती
PM किसान योजनेचा 19 वा हप्ता – 24 एप्रिल 2025 रोजी
नमो शेतकरी योजनेचा हप्ता – एप्रिल हिल्या आठवड्यात
✅ दोन्ही हप्ते वेगवेगळे दिले जातील

शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्याची माहिती बरोबर आहे ना, हे एकदा तपासा. कारण जर माहिती चुकीची असेल तर पैसे येण्यात अडचण होऊ शकते. आणखी माहिती जाणून घेण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. 🚜

Leave a Comment